InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

अमित शाहांच्या रोड शोमध्ये तृणमूल-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकत्यातील रोड शोमध्ये तृणमूल काँग्रेस विद्यार्थी परिषद आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांनी भिडल्यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले,

यावेळी अमित शाह देखील घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

मेडिकल कॉलेजजवळ हा रोड शो आल्यानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी ‘गो बॅक’चा नारा दिल्याने भाजप कार्यकर्ते चिथावले. तृणमूल आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर रोड शोमधील काही वाहनांना आग लावण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी लाठीचार्ज करुन कार्यकर्त्यांवर नियंत्रण मिळवलं.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply