InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

अमित शहांचा सभामंडप तोडण्याचे आदेश; कोलकत्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतप्त

पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये जोरदार टक्कर सुरु आहे. कोलकतामध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सभास्थळी सभेआधीच बंगाल पोलिसांनी जात परवानगीचे कागदपत्र मागितले. मात्र, कागदपत्र ने देऊ शकल्याने थेट सभामंडप तोडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे भाजपचे कार्यकर्ते सभा स्थळी जमले असून तणावाचे वातावरण आहे.

भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. हा प्रकार धक्कादायक आहे. भाजपच्या अध्यक्षांची रॅली होऊच नये यासाठी ममता सरकार कोणतीच कसर सोडत नाहीय. स्वागत मंचही उभारलेला तोडायला लावला आहे. एवढेच नाही तर रस्त्याशेजारील दोन्ही बाजुंना लावलेले फुगे आणि फलकही काढून टाकले आहेत. राजकीय वैर खूप महागात पडेल असा इशारा त्यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply