Amit Thackeray | “… असं झाल्यास मी ही विधानसभा निवडणूक लढू शकतो”, अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढणार?

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचवल्या आहेत. त्यांच्या वक्तव्याने ते भविष्यात विधानसभा निवडणूक लढणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. अलिकडेच त्यांनी अशाचप्रकारे एक विधान केलं होतं. औरंगाबाद शहरामध्ये ते पत्रकारांशी अनौपचारीक गप्पा मारत होते.

अमित ठाकरे हे आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आहेत. यादरम्यान, गरज पडल्यास मी ही विधानसभा निवडणूक लढवू शकतो, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.

दरम्यान, अलिकडेच मी जर राज ठाकरे यांचा मुलगा नसतो तर राजकारणात आलो नसतो असे अमित ठाकरे म्हणाले आहे. अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते पदावर असून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ते अध्यक्ष देखील आहे. महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण पाहून मी राजकारणात आलो नसतो असे विधान केल्याने मनसेच्या वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अमित ठाकरे हे सध्याच्या राजकारणाला कंटाळले आहे का ? मनसेला संघर्ष करूनही यश मिळत नाही म्हणून कंटाळले आहे का ? अशा विविध चर्चेला उधाण आले आहे.

महत्वाच्या बातम्या :

 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.