Amitabh Bachchan | “भावा पैसे भरले, हात जोडले, आता काय…”; बिग बींच्या ‘त्या’ ट्विटनं वेधलं सर्वांचं लक्ष

Amitabh Bachchan | मुंबई : सध्या अमिताभ बच्चन यांच्या ट्विटची सर्वत्र चर्चा होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर अनेक बदल होताना दिसत आहेत. एलॉन मस्क (Elon Musk ) यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून ट्विटरवर बरेच बदल केले आहेत. काही दिवसांपूर्वीच एलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो बदलला होता. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. अशातच आता ट्विटरने जगभरातील दिग्गज मान्यवर, नेतेमंडळी, खेळाडू, सेलिब्रिटी यांना मोठा धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वीच मस्क यांनी ट्विटरवरील ब्लू टिकसाठी (Blue Tick) पैसे मोजण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसंच ज्यांना फ्रिमध्ये ब्लू टिक मिळाली आहे त्यांचीही ब्लू टिक काढण्याचा निर्णय घेतला होता. तर आता याच निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

ट्विटरने केलेल्या या कारवाईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राहुल गांधी, प्रियांका गांधी अशा अनेक नेतेमंडळींचा समावेश आहे. तर अभिनेता सलमान खान, शाहरूख खान, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, पूजा हेगडे, आलिया भट्ट अशा अनेक सेलिब्रिटींचीही ब्लू टिक हटवण्यात आली आहे. यानंतर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी एक मजेशीर असं ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

काय म्हणाले अमिताभ बच्चन (What did Amitabh Bachchan say)

अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “ए ट्विटर भैया! ऐकतोय ना? आता तर पैसे पण भरले आम्ही…त्यामुळे ते जे निळं कमळ आहेना, ते आमच्या नावाच्या पुढे पुन्हा लावून दे भैया, जेणेरून लोकांना कळेल की मीच अमिताभ बच्चन आहे. हात तर जोडलेत आता काय पाया पडू का?” तर अमिताभ बच्चन यांनी केलेलं हे ट्विट सध्या चांगलंच चर्चेत आहे. तसंच त्यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाइक्सचा वर्षाव केला आहे. तसंच या ट्विटवर नेटकऱ्यांनी कमेंट्स देखील केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-