InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

अमिताभ बच्चन ,नसिरुद्दीन शहा ,राजकुमार राव लवकरच एका चित्रपटात

अमिताभ बच्चन यांच्या नावाचा आजही हरहुन्नरी अभिनेत्यांच्या यादीत विशेष उल्लेख होतो. प्रेक्षकांनी ज्यांच्या सकारात्मक पात्राप्रमाणेच नकारात्मक पात्रालाही डोक्यावर घेतले असे नसिरुद्दीन शहा अन् काही काळातच तरुणाईवर भूरळ पाडणारा हँडसम अभिनेता राजकुमार राव हे कलाकार लवकरच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हे त्रिकूट दिग्दर्शक कबीर कौशिक यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे.

नवीन वर्षात कबीर कौशिक यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. प्रेक्षकही या हरहुन्नरी कलाकारांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक असणार आहेत. पण अद्यापही चित्रपटाची कथा, इतर कलाकार आणि शीर्षक गुलदस्त्यातच आहे. कबीर कौशिकने याआधी ‘सेहर’, ‘चमकू’, ‘हम तुम और घोस्ट’ आणि ‘मॅक्झिमम’सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.