Amla Juice | टीम कृषीनामा: आवळा आपल्या शरीरासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर मानला जातो. आवळ्यामध्ये कॅल्शियम, आयरन, पोटॅशियम, विटामिन सी इत्यादी गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे त्वचेवरील अनेक समस्या दूर करण्यासाठी आवळ्याचा वापर केला जातो. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी देखील आवळा उपयुक्त ठरू शकतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी लोक महागडे क्रीम आणि लोशनचा वापर करतात. पण क्रीम आणि लोशनच्या ऐवजी तुम्ही आवळ्याच्या रसाचा वापर करून चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करू शकतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी तुम्ही पुढील पद्धतीने आवळ्याच्या रसाचा वापर करू शकतात.
आवळा रस आणि मध (Amla juice and honey-For Skin Care)
आवळा रस आणि मधाच्या मदतीने चेहऱ्यावरील सुरकुत्या सहज दूर केल्या जाऊ शकतात. यासाठी तुम्हाला चार चमचे आवळ्याच्या रसामध्ये एक चमचा मध मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर हे मिश्रण तुम्हाला साधारण दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. आवळ्याच्या रसासोबत मध चेहऱ्यावर लावल्याने त्वचा चमकदार होते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होऊ शकतात.
आवळा रस आणि खोबरेल तेल (Amla juice and coconut oil-For Skin Care)
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही आवळा रस आणि खोबरेल तेलाचे मिश्रण त्वचेला लावू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा खोबरेल तेलामध्ये दोन चमचे आवळ्याचा रस मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण दहा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेवरील सुरकुत्या सहज कमी होऊ शकतात.
आवळा रस आणि ऑलिव्ह ऑइल (Amla juice and olive oil-For Skin Care)
आवळ्याचा रस आणि ऑलिव्ह ऑइलच्या मदतीने चेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या दूर केली जाऊ शकते. यासाठी तुम्हाला दोन चमचे आवळ्याच्या रसामध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑइल मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. तेलकट त्वचा असलेल्यांनी या मिश्रणाचा वापर करणे टाळले पाहिजे.
चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी तुम्ही वरील पद्धतीने आवळ्याच्या रसाचा वापर करू शकतात. त्याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचे सेवन केल्याने आरोग्याला पुढील फायदे मिळू शकतात.
रोगप्रतिकारशक्ती शक्ती मजबूत होते (The immune system is strengthened-Amla Benefits)
रिकाम्या पोटी आवळ्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे शरीराला संसर्गजन्य रोगापासून दूर ठेवण्यास मदत करते. सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ल्याने किंवा आवळ्याचा रस प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. रिकाम्या पोटी आवळ्याचे सेवन केल्याने तुम्ही सर्दी-खोकल्यापासून दूर राहू शकतात.
हाडे मजबूत होतात (Bones become stronger-Amla Benefits)
आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळून येते. आवळा खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो. आवळ्यामध्ये पोटॅशियम देखील भरपूर प्रमाणात आढळून येते, जे शरीराच्या स्नायूंसाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचे सेवन करू शकतात.
पचनसंस्था निरोगी राहते (Digestive system remains healthy-Amla Benefits)
आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारू शकते. त्याचबरोबर रिकाम्या पोटी आवळ्याचे सेवन केल्याने बद्धकोष्टता आणि ऍसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या