Amol Kolhe | काही क्षणात ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्यात पडद्यामागे काय घडतं? पाहा VIDEO

Amol Kolhe |औरंगाबाद:डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) एक राजकीय नेता म्हणून प्रसिद्ध आहेतच, पण त्याहून अधिक त्यांच्या अभिनयाला उत्तम दाद दिली जाते. छत्रपती शिवरायांची भूमिका साकारावी तर ती अमोल कोल्हे यांनीच, असे अनेक जणांचे मत आहे. कारण त्यांनी मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून साकारलेली छत्रपती शिवरायांची भूमिका लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे ऐतिहासिक भूमिका आणि अमोल कोल्हे हे एक समीकरण झाले आहे.

अमोल कोल्हे यांचे ‘शिवपुत्र संभाजी’ हे महानाट्य औरंगाबाद येथील जाबिंदा मैदानावर सुरू आहे. अमोल कोल्हे आणि टीमने या नाटकाला खुल्या मैदानात लोकांसमोर उभे केले आहे. मोकळ्या मैदानामध्ये लोकांना हे इतिहासातील सुवर्णक्षण अनुभवायला मिळत आहे. दरम्यान, हे नाटक खुल्या मैदानावर सादर करत असताना अमोल कोल्हे यांना काय करावं लागतं याबद्दल त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

अमोल कोल्हे यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येते की, एखाद्या अभिनेत्याला कुठलीही भूमिका साकारताना किती घाम गाळावा लागतो. अमोल कोल्हे यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये नाटकाच्या अंकाच्या आधीचा आणि अंकाच्या नंतरच्या तयारीची धुमाकूळ दाखवली आहे. यामध्ये अमोल कोल्हे एक अंक संपवून पडद्यामागे येताना दिसत आहे. त्यानंतर पुढच्या अंकासाठी ते तयारी करताना दिसत आहे. त्यांना तयार करण्यासाठी त्यांचे सहकारी मदत करत आहे. अवघ्या काही क्षणातच त्यांनी यांनी संभाजी महाराजांचे रूप धारण केले आहे.

एवढ्या गडबडीमध्ये तयार होऊन पुढच्या अंकासाठी राजेशाहीला शोभेल अशा रुबाबत ते घोड्यावर बसून निघून जातात. अमोल कोल्हे यांचा हा व्हिडिओ बघून अंगावर रोमांच उभा राहत आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.