Amol Kolhe | ठाकरेंना गोलीगत धोका मिळणार; महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार – अमोल कोल्हे

Amol Kolhe | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे यांनी भाषण केलं आहे. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असला पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी कंबर कसून तयारी करायची आहे, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. अमोल कोल्हे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

The next Chief Minister of Maharashtra will be from NCP – Amol Kolhe

अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले, “विरोधक म्हणतात आधी राष्ट्रीय पक्ष होऊन दाखवा आणि मग बोला. मात्र, त्यांना कुणी तरी सांगा वाघ झेप घेण्याआधी दोन पावलं मागे जातो आणि नंतर झेप घेतो. नंतरची ती झेप नरडीची घोट घेणारी झेप असते. या वर्धापन दिनानिमित्त आम्ही ही झेप घेण्याचा निश्चय करणार आहोत.”

पुढे बोलताना ते (Amol Kolhe) म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांना आम्ही कधी बघितलं नाही. मात्र, एक व्यक्ती गेल्या 50-55 वर्षापासून त्यांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवत आहे. ती व्यक्ती म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब (Sharad Pawar).”

राज्याचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा पाहिजे, असं अमोल कोल्हे (Amol Kolhe)  म्हणाले आहे. अमोल कोल्हे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला डच्चू देणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://maharashtradesha.com/amol-kolhe-said-that-the-next-chief-minister-of-maharashtra-will-be-from-ncp/?feed_id=45355