Amol Kolhe | बेळगावचा उल्लेख ‘बेळगावी’ केल्यानं अमोल कोल्हेंनी दिलगिरी केली व्यक्त म्हणाले…

Amol Kolhe | मुंबई : शिरूर मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या एका वक्तव्यावरून महाराष्ट्र एकीकरण समितीने त्यांच्यावर केलेल्या उल्लेखामुळे टीका देखील केली आहे. यामुळे आता अमोल कोल्हेंवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनावधानाने उल्लेख केला असल्याचे अमोल कोल्हे म्हणाले आहेत. याबाबत त्यांनी एक व्हिडीओ देखील समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केला आहे.

“सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो” Apologies to all 

“येत्या 5 तारखेला मला बेळगाव येथील राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी बोलावलं. यामुळे या कार्यक्रमाला येत होतो. निपाणीमध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्याला जात असताना घाईत या कार्यक्रमाबद्दल बोलताना बेळगावचा माझ्याकडून चुकीचा उल्लेख झाला. याबाबत मराठी बांधवांच्या भावना दुखावल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो”, असे अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

“माझी काय भूमिका आहे. ते आजतागायत सर्वांना माहीत आहे. मी आजही त्या भूमिकेवर ठाम आहे. सीमाभागात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा होत आहे. यामुळे मी कार्यक्रमाला येण्याचे कबूल केले होते. यात बेळगावचा माझ्याकडुन अनावधानाने चुकीचा उल्लेख झाल्याने आपल्या भावना दुखावल्याबद्दल सर्वांची माफी मागतो.”, असे अमोल कोल्हेंनी म्हणाले आहेत.

अमोल कोल्हेंची दिलगिरी

“बेळगाव येथील राजहंसगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास मी तमाम सीमावासीय मराठी बांधवांच्या भावनांचा आदर करून उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी सदैव सीमावासीय मराठी बांधवांसोबत सोबत होतो, आहे व राहीन!”, असे ट्विट करत अमोल कोल्हेंनी व्हिडिओच्या माध्यमातून ट्विट केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.