Amol Kolhe | “भूमिका घ्यायला कचरण्याच्या काळात…” ; अमोल कोल्हेंची विक्रम गोखलेंसाठी भावूक पोस्ट
Amol Kolhe | मुंबई : दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले (Actor Vikram Gokhale passes away). गोखले यांनी आज २६ नोव्हेंबर रोजी दुपारी पुण्यातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज संध्याकाळी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून विक्रम गोखले (Actor Vikram Gokhale) पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात दाखल होते. दरम्यान कलाविश्वात शोककळा पसरली आहे. अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी विक्रम गोखले यांच्यासाठी भावूक पोस्ट केली आहे.
अमोल कोल्हे यांची पोस्ट –
विक्रमकाका, तुमची उणीव भासत राहील!
जेव्हा जेव्हा कुणी अभिनेता
कॅमेराला डबल लूक देईल ,
जेव्हा जेव्हा फक्त देहबोलीतून
पानभर संवाद बोलला जाईल
जेव्हा जेव्हा घेतलेल्या पॉज मधूनही
अचूक अर्थ पोहोचवला जाईल
जेव्हा जेव्हा एन्ट्रीच्या थाटावरून
पात्राची पूर्ण पार्श्वभूमी उभी राहील
जेव्हा जेव्हा ‘बिटवीन द लाईन’
संवादापेक्षा अधोरेखित होईल..
…
भूमिका घ्यायला कचरण्याच्या काळात
निर्भीड भूमिका मांडली जाईल..
तेव्हा तेव्हा विक्रमकाका…..
तुमची उणीव भासत राहील!!!
अभिनेते विक्रम गोखले (Actor Vikram Gokhale) हे नाव डोळ्यासमोर येताच त्यांनी केलेले बॉलीवूडमधील अगणित पात्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. त्यांनी संजय लीला भन्सालीच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटामध्ये ऐश्वर्या रायच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर त्यांनी बॉलीवूडमधील सुपरहिट भुलभुलय्या, दिल से, दे दनादन, हिचकी, मिशन मंगल यासारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला होता. विक्रम गोखले यांनी मराठी चित्रपटासोबतच हिंदी चित्रपटांमध्ये ही भरपूर काम केले आहेत.
विक्रम गोखले हे नाव हिंदी चित्रपट सृष्टीसह मराठी रंगभूमीवरही चांगलेच गाजलेले आहे. विक्रम गोखले यांच्याकडे अभिनयाचा पारिवारिक वारसा होता. कारण त्यांची पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय पडद्यावरील पहिल्या महिला अभिनेत्री होत्या असे म्हटले जाते. त्याचबरोबर त्यांची आजी कमलाबाई गोखले देखील भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिली महिला बाल कामगार म्हणून ओळखल्या जातात.
महत्वाच्या बातम्या :
- Vikram Gokhale | दिग्गज अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड, वयाच्या 77 व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास
- Cholesterol | चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी ‘या’ गोष्टींचा करा आहारात समावेश
- Yuva Sena | “शहाजी बापू पाटील यांच तोंड गटारीसारखं” ; ठाकरे गट युवा सेना प्रवक्त्याची टीका
- Diabetes Tips | शुगर लेव्हल नियंत्रणात ठेण्यासाठी करा बदामाचे सेवन, जाणून घ्या रोज किती खावेत बदाम
- Gunaratn Sadavarte | गुणरत्न सदावर्तेंच्या पत्रकार परिषदेत राडा ; संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अंगावर फेकली काळी पावडर
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.