Amol Kolhe । दुखापतीनंतर अमोल कोल्हेंची “ही” पोस्ट चांगलीच चर्चेत

Amol Kolhe | मुंबई : काही दिवसांपूर्वी शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोगावेळी घोड्यावर बसून एण्ट्री घेत असताना खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना दुखापत झाली होती. त्यानंतरही त्यांनी औषधं घेऊन चेहऱ्यावर दुखापतीचा भाव न उमटू देता जिद्दीने प्रयोग सादर केला. मात्र डॉक्टरांनी विश्रांती करण्याचा सल्ला दिल्याने कोल्हे यांचे पुढील काही दिवसांचे प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. तर आता त्यांनी फोटो पोस्ट करत तब्बेतीबद्दल माहिती दिली आहे.

काय म्हणाले अमोल कोल्हे (What did Amol Kolhe say)

अमोल कोल्हे यांना डॉक्टरांनी सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. तर पोस्ट करत त्यांनी लिहलं आहे की, ‘काळजी करण्याचं कारण नाही. पुढे झेप घेण्यासाठी दोन पावलं मागे यावं लागतं. थोडीशी सक्तीची विश्रांती, परंतु दुखापत फार गंभीर नाही. लवकरच भेटू’, असं लिहित त्यांनी शिवपुत्र संभाजी महानाट्याची पुढील तारीख आणि स्थळाची माहिती दिली आहे. यामुळे ही सकारात्मक ऊर्जा देणारी पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. त्यांनी केलेल्या पोस्टवर अनेकांनी कंमेंट देत विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील कंमेंट करत सर्वकाही ठीक असेल अशी आशा करते. असं कमेंटमध्ये म्हटलं आहे. तर ‘काळजी घे रे, तुला विश्रांती मिळावी म्हणून फोन केला नाही,’ असं सुकन्या मोने यांनी लिहिलंय. तसचं अभिनेत्यांनी देखील काळजी घ्या ,आराम करा अश्या कंमेंट दिल्या आहेत. कोल्हे यांना नाटकाच्या प्रयोगादरम्यान संभाजी महाराजांच्या वेषातील डॉ. कोल्हे घोड्यावरुन एण्ट्री घेत असताना घोड्याचा मागील पाय अचानक दुमडला आणि त्यामुळे पाठीला जर्क बसून त्यांच्या मणक्याला दुखापत झाली.

महत्वाच्या बातम्या-