‘आधी अधिकृत घोषणा होऊ दे’; शिवसेनेसोबत सरकार स्थापनेबाबत कोल्हे यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादीची धडाडती तोफ म्हणजे खासदार अमोल कोल्हे. त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करत लोकसभेची निवडणूक लढवत ते खासदार झाले. तसेच विधानसभेला त्यांनी विरोधकांना आपल्या जेरीस आणले.

सध्या महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं संयुक्त सरकार स्थापन होण्याच्या हालचाली सुरु आहेत. संयुक्त सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांची गुरुवारी सहमती झाली.

शेतकरी कर्जमाफी, सर्वसमावेशक विकास या मुद्दय़ांवर तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये एकमत झाले असून, वादग्रस्त मुद्दय़ांना हात घालायचा नाही, असा निर्णय घेण्यात आला. दरम्यान शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यावर प्रतिक्रिया दिली असून, आधी अधिकृत घोषणा होऊ दे, मग त्यावर चर्चा करु असं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.