‘एक अभिनेता म्हणून अमोल कोल्हे नथुराम गोडसे ते अफझल खान कोणाचीही भूमिका साकारू शकतात’

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेतून घराघरात आणि जनतेच्या मनात पोहोचलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आपल्या अजून एका भूमिकेमुळे चर्चेत आले आहेत. यानंतर आता ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात नथुराम गोडसे यांची भूमिका करणारे राष्ट्रवादीचे खा. अमोल कोल्हे नव्या वादात सापडले आहेत.

या त्यांचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर ३० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचे खासदार असताना गांधींची हत्या करणाऱ्या गोडसे यांचे समर्थन करणारी भूमिका तुम्ही कशी करू शकता, असा सवाल त्यांना विचारला जाऊ लागला आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हेंची बाजू घेतली आहे.

यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही एक कलावंत म्हणून कोल्हे कुठलीही भूमिका करू शकतात, असे विधान करून अमोल कोल्हेंचे समर्थन केले आहे. पाटील माध्यमांशी बोलत होते. ‘नथुराम गोडसेंच्या विचाराशी ते किती सहमत आहेत? हे अमोल कोल्हेंनी एकदा स्पष्ट करावे. एक अभिनेता म्हणून ते नथुराम गोडसे ते अफझल खानचीही भूमिका साकारू शकतात यात मला काही चुकीचे वाटत नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा