Amol Mitkari | एकनाथ शिंदे आणि शरद पवारांच्या ‘त्या’ भेटीवरून अमोल मिटकरींचं सूचक विधान, म्हणाले…
Eknath Shinde | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना 31 ऑक्टोंबर रोजी ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना भेटायला चक्क राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गेले होते. त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी (Amol Mitkari)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवारांना भेटायला गेले. तिथून आल्यानंतर त्यांनी स्वत: सांगितलं की शरद पवारांची प्रकृती चांगली आहे. ही माहिती दस्तुरखुद्द एकनाथ शिंदेंनीच दिली. कालची भेट भविष्यात वेगळं काहीतरी देऊन जाईल, याबाबत कुणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. अमोल मिटकरी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी पवारांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीबाबतही माहिती दिली आहे. भेट घेतल्यानंतर शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधाला. शरद पवार यांची प्रकृती चांगली आहे. शरद पवार यांनी माझ्याशी संवाद साधला.
उद्या ते शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबीराला जाणार आहेत. त्यानंतर पुन्हा रुग्णालयात येऊन त्यांच्या काही टेस्ट करतील. परत त्यांना डिस्चार्ज मिळेल, असं शरद पवार यांनी सांगितलं, असल्याचं शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
- Nitin Gadkari | “कारण नसताना लोक…”, प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याने होणाऱ्या टीकांवर नितीन गडकरी कडाडले
- Deepak Kesarkar | “बाळासाहेबांची खिल्ली उडवणाऱ्या…” ; दीपक केसरकरांचा सुषमा अंधारेंवर जोरदार पलटवार
- Tulsi Vivah 2022 | आज पासून सुरू होत आहे तुळशी विवाहाचा मुहूर्त, जाणून घ्या शुभ मुहूर्त
- MS Dhoni | … म्हणून महेंद्र सिंग धोनीने उच्च न्यायालयात घेतली धाव
- Sushma Andhare | राज ठाकरेंवर तुम्ही गुन्हे दाखल केले का? ; सुषमा अंधारेंचा सवाल
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.