Amol Mitkari | कृषीमंत्री सभागृहात असताना राजीनामा का नाही मागितला? ; अमोल मिटकरींचा स्वपक्षीयांना सवाल

Amol Mitkari | नागपूर : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन वाटल्याप्रकरणी व  कृषी महोत्सवाच्या नावाखाली वसुली केल्याचा गंभीर आरोप होत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्व:ता हा मुद्दा विधानसभेत मांडला होता. यानंतर हा गदारोळ झाला. विरोधी सदस्यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावर अब्दुल सत्तार हे देखील दोन दिवस गप्प होते. मात्र काल (बुधवार) अब्दुल सत्तार हे सभागृहात होते. त्यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण देखील दिले. मात्र विरोधी पक्ष शांत होता. राजीनाम्याची मागणी तिव्रतेने झाली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी केली. एकप्रकारे अमोल मिटकरी यांनी स्वपक्षीयांना टोला लगावला आहे.

“कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि इतर यांनी जो अवैध भुखंड वाटला त्याचप्रमाणे कृषी महोत्सवाच्या नावाखाली जी वसुली कृषीमंत्र्यांकडून झाली त्याविरुद्ध राजीनाम्याची मागणी कालपासून तीव्र होणे अपेक्षित होती. सभागृहात कृषीमंत्री बसलेले असताना त्यांचा राजीनामा कुणीच का नाही मागितला?”, असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला.

वाशिममधील गायरान जनिमीवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 26 तारखेला (सोमवार)  सभागृहात आक्रमक भूमिका घेतली होती. “मंत्री अब्दुल सत्तार यांनी वाशिम जिल्ह्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून तब्बल 150 कोटींचा घोटाळा केला. नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठानेही कठोर शब्दात ताशेरे ओढले”, असा आरोप अजित पवार यांनी विधानसभेत केला होता. मात्र काल अब्दुल सत्तार सभागृहात हजर होते मात्र विरोधकांनी तिव्रतेने राजीनाम्याची मागणी केली नाही.

काय म्हणाले होते अजित पवार – 

अजित पवार म्हणाले, “अब्दुल सत्तार महसूल राज्यमंत्री असताना वाशिम जिल्ह्यातील मौजे घोडबाबूळ येथील सरकारी गायरान जमीन गट क्रमांक 44 मधील 37 एक्कर 19 गुंठे जमीनीचा घोटाळा झाला. किंमत काढली तर हा घोटाळा 150 कोटींचा आहे. गायरान जमीनी कुणाला देता येत नाहीत, असा सुप्रिम कोर्टाचा निकाल आहे. त्याचे पालन आपण सर्वांनी केले आहे. तेव्हाचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोर्टाचा निकाल आणि राज्य सरकारच्या आदेशाची संपूर्ण माहिती असताना 37 एक्कर गायरान जमीन योगेश खंडागळे या व्यक्तिला वाटप करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय कायदेशीर बाबींचे उल्लंघन करणारा होता.”

अजित पवार म्हणाले, “आणखी एक गंभीर प्रकरण आहे. सिल्लोड येथे 1 ते 10 जानेवारी दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय कृषि व क्रीडा महोत्सवासाठीही अब्दुल सत्तार यांनी कृषी विभागाला वेठीस धरून कोट्यवधी रुपयांची वसुली सुरू केली. त्यासाठी दहापेक्षा जास्त तालुके ज्या जिल्ह्यामध्ये आहेत त्यांनी प्लॅटिनिअम म्हणजे 25 हजार रुपयांच्या 30 प्रवेशिका खपवायच्या. डायमंड 15 हजारांच्या 50 प्रवेशिका खपवायच्या. 10 हजारच्या 75 प्रवेशिका खपवायच्या. साडेसात हजारांच्या सिल्वर 150 प्रवेशिका खपवायचे टार्गेट दिले आहे. हा भ्रष्टाचार नाही आहे का?. त्यामुळे संबंधित मंत्र्यांचा राजीनामा सरकारने घ्यावा.”

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.