Amol Mitkari | ज्याच्या तोंडात 24 तास विष असतं तो विषारीच बोलणार- अमोल मिटकरी

Amol Mitkari | पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मंत्रिमंडळ विस्तराबाबत चर्चा सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला अपात्र 16 आमदारांच्या निकालाबाबत हालचालींना वेग आला आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधीपक्ष एकमेकांना चांगलेच भिडलेले पाहायला मिळत आहेत. तर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर सडकून टीका केली आहे.

स्वतःचा आवाका आधी बघा मग बोला : अमोल मिटकरी

माध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले की, भाजपमध्ये असे काही सुपारी बहाद्दर आहेत ज्यांना फक्त शरद पवार ( Sharad Pawar) आणि त्याच्या कुटुंबीयांनाविषयी बोलण्यासाठी ठेवलं आहे. त्यांना सांगितलं असेल की तुम्ही बोला मग मंत्रिपद मिळेल यामुळे त्यांना कळलं पाहिजे की मंत्रिपद मिळण्यासाठी ज्ञान असावा लागत. “ज्याच्या तोंडात 24 तास विष असतं तो विषारीच बोलणार”. म्हणून सांगतोय स्वतःचा आवाका आधी बघा मग बोला. अशा शब्दात अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी गोपीचंद पडळकरांनवर (Gopichand Padalkar) सडकून टीका केली.

Amol Mitkari Commented On Gopichand Padalkar

दरम्यान, मिटकरी (Amol Mitkari) यांनी पुण्यातील वाघेश्वर मंदिराबाबत भाष्य करत म्हटलं आहे की, जर मंदिरांमध्ये भाविकांना अशा वेस्टर्न कपड्यामध्ये प्रवेश दिला जात नसेल तर पुजाऱ्यांना देखील तो नियम लागू करा. संविधानाने सर्वांना समान अधिकार,हक्क दिलेत तर त्यानुसार केलं पाहिजे. असं मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले. तर गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांच्यावर निशाणा साधत म्हटलं होत की, शरद पवारांच्या मुलीला लव्ह जिहादचा अर्थ माहीत नाही तर त्यांनी ज्या मुलीसोबत घटना घडली आहे. तिच्याशी येऊन बोलावं मग समजेल . याचप्रमाणे शरद पवारांवर देखील निशाणा साधला होता. यावरून अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पडळकरांचा समाचार घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3IJ8GXV