Amol Mitkari | “तुका म्हणे तोचि वेडा, त्याचे हाणूनी थोबाड फोडा”; रामदेव बाबांच्या विधानावर अमोल मिटकरी आक्रमक
Amol Mitkari | मुंबई : शिंदे गटाचे अब्दुल सत्तार, काँग्रेस नेते राहुल गांधी , राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानांची प्रकरणं ताजी असतानाच रामदेव बाबा यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. आज ठाण्यातील एका कार्यक्रमात रामदेव बाबांनी महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केलं आहे. रामदेव बाबांच्या या विधानाचे आता पडसाद दिसायला सुरुवात झाली आहे. रामदेव बाबांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्विटच्या माध्यमातून रामदेव बाबांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
रामदेव बाबांच्या वादग्रस्त विधानावर अमोल मिटकरी यांनी संत तुकाराम यांच्या अभंगांच्या ओळी ट्विट करत रामदेव बाबांवर टीका केली. ते म्हणाले की, “कुठं ते गाडगेबाबा आणि कुठे हा रामदेव बाबा ? महाराष्ट्रात तुकोबा ते गाडगेबाबा अशी संतांची सुसंस्कृत परंपरा आहे. आज रामदेव बाबांनी स्त्रियांचा अपमान करून या परंपरेला तडा दिला आहे . “छाटी भगवी मानसी ! व्यर्थ म्हणे मी संन्यासी !तुका म्हणे तोचि वेडाl त्याचे हाणूनी थोबाड फोडा ll”, अशा आशयाचं ट्विट त्यांनी शेअर केले आहे.
कुठं ते गाडगेबाबा आणि कुठे हा रामदेव बाबा ? महाराष्ट्रात तुकोबा ते गाडगेबाबा अशी संतांची सुसंस्कृत परंपरा आहे. आज रामदेव बाबांनी स्त्रियांचा अपमान करून या परंपरेला तडा दिला आहे .
"छाटी भगवी मानसी !
व्यर्थ म्हणे मी संन्यासी !तुका म्हणे तोचि वेडाl त्याचे हाणूनी थोबाड फोडा ll— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 25, 2022
दरम्यान, त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombare) यांनी संताप व्यक्त केलाय. त्या म्हणाल्या, महिलांनी काय घालायचं काय नाही हा तिच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. हे विधान अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांच्या समोर झालं आहे. अमृताताईंनी त्यांच्या सणकन कानाखाली ओढायला हवी होती, अशी संतप्त प्रतिक्रिया रुपाली ठोंबरे यांनी दिली आहे.
नेमकं घडलं काय?
ठाण्यामध्ये महिलांसाठी योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. योगा कार्यक्रमात महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते आणि त्यानंतर महिलांसाठी महासंमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. या महासंमेलनासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र दोन्ही कार्यक्रम सलग असल्याने महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. याबाबत बाबा रामदेव यांनी म्हटलं की साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही अडचण नाही. आता घरी जाऊन साड्या नेसा. पुढे रामदेव बाबा म्हणाले की, “महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटतात, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने तर काही नाही घातलं तरी त्या चांगल्या दिसतात.”
महत्वाच्या बातम्या :
- Skin Care Tips | पार्लरमध्ये न जाता ग्लोइंग स्किन हवी असेल तर, करा ‘या’ आयुर्वेदिक पद्धती फॉलो
- Health Tips | ब्रश न करता पाणी पिणे आहे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या!
- Vinayak Raut | “फडणवीस हे रंग बदलणारी राजकीय औलाद”; विनायक राऊतांचा हल्लाबोल
- Rohit Sharma | रोहित शर्माच्या ऐवजी ‘हे’ खेळाडू बनू शकतात भारताचे कसोटी कर्णधार
- Ajit Pawar | शिंदे गट कामाख्या देवीच्या दर्शनाला कुणाचा बळी देणार काय माहित? – अजित पवार
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.