Amol Mitkari | “तुझी लायकी जनतेला माहितीये, आम्हाला घाणीत दगड…”; निलेश राणेंच्या ‘त्या’ टीकेवरुन अमोल मिटकरी आक्रमक
Amol Mitkari | मुंबई : पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth) आणि पिंपरी चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणुकीचा (BY Election) निकाल आज जाहीर झाला आहे. कसबा पेठेत भाजपला मोठा धक्का बसल्याचं पहायला मिळालं, तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला झटका बसला. यावरून भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळली आहे.पिंपरी चिंचवडच्या भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांचा विजय झाला आहे तर राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
या निवडणुकीत महिलेने पराभव केल्याचं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर जहरी टीका केली आहे. निलेश राणेंनी केलेल्या टीकेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी निलेश राणेंना सडेतोड उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले निलेश राणे?
“पिंपरी चिंचवड मध्ये एका महिलेने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाडला, मुत्र्या अजित पवार एक महिना पिंपरी चिंचवडला ठाण मांडून सुद्धा तुला एका महिलेने पाडला महिलेने”, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला आहे. या टीकेला आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पिंपरी चिंचवड मध्ये एका महिलेने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाडला,
मुत्र्या अजित पवार एक महिना पिंपरी चिंचवडला ठाण मांडून सुद्धा तुला एका महिलेने पाडला महिलेने.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 2, 2023
अमोल मिटकरींचं सडेतोड उत्तर
“फारच चिल्लर झालास तु तर, आमच्या पक्षाच्या काही मर्यादा आहेत नाहीतर , तुझ्यापेक्षा खालची पातळी मला गाठता येते. तुझी लायकी जनतेला माहीत आहे. आम्हाला घाणीत दगड मारायची सवय नाही”, असं मिटकरी म्हणाले आहेत.
निलेश राणेंनी अजित पवारांवर का टीका केली?
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी बोलताना अजित पवारांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर बोचरी टीका केली होती. “नारायण राणेंनी शिवसेना सोडली. सगळे पडले. नारायण राणे साहेब तर दोनदा पडले. एकदा कोकणात आणि एकदा मुंबईत पडले. तिथे तर त्यांना महिलेनं पाडलं. बाईनं पाडलं नारायण राणेंना बाईनं”, असं अजित पवार म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या-
- Uddhav Tahckeray | “वापरा आणि फेका हे भाजपचं धोरण”; उद्धव ठाकरेंचे भाजपवर ताशेरे
- Sanjay Raut | मोठी राजकीय घडामोड; संजय राऊतांना खुद्द शरद पवारांचं समर्थन
- Ajit Pawar | राम सातपुतेंनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया
- Sharad Pawar | भाजप आमदाराकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख; सभागृहात गदारोळ
- Ravindra Dhangekar | “कसबा भाजपचा बालेकिल्ला नव्हताच”; नविर्वाचित आमदार रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया
Comments are closed.