Amol Mitkari | “दरेकरजी, तुमच्या घरात आंबेडकर, महात्मा फुले यांची प्रतिमा असेल तर फोटो शेअर करा आणि…”; अमोल मिटकरीचं ओपन चॅलेंज

Amol Mitkari |  मुंबई : भाजपाच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी, तसेच, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मुख्यमंत्री बोम्मईंची विधान, राज्यातील प्रकल्पांची पळवापळव, महागाई आणि बेरोजगारी या विरोधात आज ( १७ डिसेंबर ) ‘महाविकास आघाडी’च्या वतीने ‘महामोर्चा’चे आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चासाठी महाविकास आघाडीचे नेतेमुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांना खुलं आवाहन दिल आहे.

अमोल मिटकरी म्हणाले, “प्रवीण दरेकरजी, तुमच्या घरात जर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी प्रतिमा असेल, तर त्याचा फोटो शेअर करा, अन् एक लाख रूपये घेऊन जा!” पुढे ते म्हणाले, “आता चॅलेंज दिलं म्हणून दुकानातून नवी प्रतिमा घेऊन याल आणि लालसेपायी त्याचा फोटो शेअर कराल तर तसं चालणार नाही. आधीपासून जर तुमच्या घरात फुले, आंबेडकर यांची प्रतिमा असेल तर त्याचा फोटो शेअर करा.”

अमोल मिटकरी यांनी यासंदर्भात ट्विट देखील  केलं आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी भाजपच्या नेत्यांवर खोचक टीका केली आहे.

आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, चित्राताई वाघ, प्रवीण दरेकर यांच्या घरात बाबासाहेबांचा किंवा महात्मा फुलेंचा फोटो असल्यास त्यांनी शेअर करावा व एक लाख रुपये बक्षीस माझ्याकडून रोख घेऊन जावेत. ओठांवर बाबासाहेब आणि पोटात गोळवलकर असणाऱ्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.