Amol Mitkari | देवेंद्र फडणवीस वैफल्यग्रस्त झाले – अमोल मिटकरी

Amol Mitkari | टीम महाराष्ट्र देशा: दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या आगामी मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केलं. राज्याचा पुढचा मुख्यमंत्री ठरवण्याचा निर्णय पक्षातील वरिष्ठ अधिकारी घेतील, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्यावर अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्रजी फडणवीस वैफल्यग्रस्त झाले असल्याचं अमोल मिटकरी यांनी ट्विट करत म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं असल्याचं देखील त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Devendra Fadnavis has come out of depression – Amol Mitkari 

ट्विट करत अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले, “देवेंद्रजी फडणवीस वैफल्यग्रस्त झाले आहेत. नैराश्यातुन ते बेताल सुटले आहेत. पेशवे काळातील फडणीशी लोकशाहीत चालत नाही हे बहुतेक ते विसरलेत.मी त्यांच्या अनेक मुलाखती पाहतो मात्र परवा मुलाखतीत ते आतुन पोखरल्याचे व शिंदें सोबत बिनसल्याचे स्पष्ट जाणवते आहे.#नैराश्य”

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिकन भारत वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप आगामी निवडणूक लढणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3reb42H