Amol Mitkari | “धैर्यशील माने यांना दुसऱ्या राज्यात जाण्यास मनाई असेल तर कसली ही आझादी?”; अमोल मिटकरींचा संतप्त सवाल

Amol Mitkari | नागपूर : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशातच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज बेळगावमध्ये महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांना अध्यक्ष म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनीही बेळगावला जाणार असल्याचं सांगितलंही होतं. मात्र आता त्यांचा हा बेळगाव दौरा रद्द करण्यात आला आहे.

या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय. यावेळी बोलताना त्यांनी सरकारमधील नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल नेहमीच बेताल वक्तव्य केली जात असल्याचा उल्लेखही केलाय. भाजपा नेत्यांनी थोडा इतिहास जाणून घेऊन महापुरुषांबद्दल बोलावं, अशा शब्दात त्यांनी सुनावलं आहे.

ते म्हणाले, गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली. त्या बैठकीत काय चर्चा झाली हे माहिती नसलं तरीही आपल्या राज्यातील एका खासदाराला दुसऱ्या राज्यात येऊ दिले जात नाही मग कसली आझादी?, कोण म्हणतं आझादी का अमृत महोत्सव”, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

आमदार अमोल मिटकरी यांनी अमित शाह यांच्या बैठकीची आठवण करून देत दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांबरोबर नेमकी काय चर्चा झाली आहे. हे त्यांनी जाहीर करावे अशीही मागणी केली आहे. आमच्या राज्यातील एका खासदाराला दुसऱ्या राज्यात जाण्यास मनाई केली जात असेल तर हा लोकशाहीचा अपमान असल्याचं मिटकरी म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.