Amol Mitkari | “पक्षातील वाचाळवीरांना आवर घाला नाहीतर…”; अमोल मिटकरींचा उद्धव ठाकरेंना इशारा
Amol Mitkari | मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसह ( BJP) महाविकास आघाडीने देखील कंबर कसली आहे. याबाबत बैठका देखील पाहायला मिळत आहेत. परंतु, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर टीका- टिपण्णी करत असल्याचे देखील पाहायला असून विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) आणि खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांच्यात कायम शाब्दिक मतभेद पाहायला मिळतात. तर आता संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी अजित पवार ( Ajit Pawar) आणि राष्ट्रीवादी काँग्रेसवर ( Ncp) केलेल्या टिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्विट करत उत्तरं दिलं आहे. तसचं उद्धव ठाकरेंना ( uddhav Thackeray) इशारा देखील दिला आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी
अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) ट्विट करत म्हटलं आहे की, “आदरणीय उद्धवजी आमची विनंती आहे की आपल्या पक्षातील वाचाळवीरांना आवर घाला. तोंड आम्हालाही आहे. आम्ही तुमचा, मातोश्रीचा, तुमच्या पक्षाचा कायमच आदर करत आलो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संकटकाळात आपल्यासोबत उभा राहिलाय. गल्लीतल्या टुकार ‘दादाहो’, राष्ट्रवादी पक्षाबद्दल बोलत असतील, तर आम्हालाही व्हिडीओ लावावे लागतील”, अशा शब्दांत अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) ट्वीट करत म्हटलं आहे.
आदरणीय उद्धवजी,आपल्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे,विनंती ही की आपल्या पक्षातील वाचाळविरांना आवर घालावा. रा.कॉ.पक्ष संकटकाळात आपल्या सोबत उभा राहिलाय . गल्लीतील टुकार "दादाहो "राष्ट्रवादी पक्षाबद्दल बोलत असतील तर आम्हालाही VDO लावावे लागतील.@uddhavthackeray@AUThackeray
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 21, 2023
(Amol Mitkari Commented On Sanjay Raut )
दरम्यान, माध्यमांशी बोलताना देखील अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) म्हटलं की, मी महाविकास आघाडीतील एक घटक आहे. यामुळे मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना विनंती केली आहे की कृपया ज्या सभा होत आहेत त्यामध्ये ज्यांच्याविरुद्ध लढायचं आहे, त्यांच्यावरच तुमच्या लोकांनी बोललं पाहिजे. विनाकारण उठसूट जर कोणी अजित पवारांवर बोलत असेल. ते संजय राऊत ( Sanjay Raut) डीएनए चेक करा म्हणतात. तर कोणी त्यांच्या पहाटेच्या शपथविधीचा व्हिडीओ लावत असेल तर आम्ही देखील आमच्या मर्यादा पाळणार नाही. उध्दवजींनी पक्षातील वाचाळवीरांना आवर घातला नाहीतर आम्ही मागेपुढे पाहणार नाही. मग त्याचे परिणाम काहीही झाले तरी चालेल. असा इशारा देखील त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Aditya Thackeray | नागपूरमध्ये झळकले भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंचे पोस्टर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- Weather Update | राज्यात पुन्हा एकदा अवकाळी संकट! ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता
- Jitendra Awhad | नोटबंदीवरून जितेंद्र आव्हाडांची ट्विट करत केंद्र सरकारवर टीका ; म्हणाले…
- Gautami Patil | गौतमी पाटीलचा ‘कार्यक्रम अन् राडा’ लागणार ब्रेक; पोलिसांनी लढवली शक्कल
- Sameer Wankhede | समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ; 5 तास सीबीआयच्या चौकशीनंतर होऊ शकते निलंबन
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3BMQuZj
Comments are closed.