Amol Mitkari | “पुढच्या आषाढी एकादशीला मविआचा मुख्यमंत्री…”;अमोल मिटकरींचं मोठं विधान

Amol Mitkari | अहमदनगर : राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं दिसत आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे गटात कलगीतुरा रंगलेला असतानाच सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असा सामनाही पाहायला मिळत आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन करून चार महिने उलटली आहेत. तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारला फैलावर घेतलं आहे.

यासोबतच  शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. तसेच येत्या काही दिवसांत राज्यातील शिंदे फडणवीस सरकार कोसळेल आणि राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल, असा दावाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांकडून केला जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मोठं विधान केलं आहे.

मिटकरी म्हणाले, येत्या आषाढी कार्तिकीला राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्रीच पांडुरंगाची शासकीय महापूजा करतील. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आज कार्तिकी एकादशीनिमित्त शिर्डी येथे मंथन शिबिराला उपस्थित असताना हे विधान केलं आहे. ज्या-ज्या वेळी आषाढी कार्तिकी किंवा पंधरवाडा एकादशीचा योग आला, तेव्हा-तेव्हा राज्यात बरंच मोठं परिवर्तन घडलं. महाराष्ट्रातील जनतेच्या विशेषत: शेतकऱ्यांच्या मनात शिंदे-फडणवीस सरकारबद्दल प्रचंड रोष असल्याचं मिटकरी यावेळी बोलताना म्हणाले.

पुढे ते म्हणाले, आगामी आषाढी एकादशीला महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीच पांडुरंगाची शासकीय महापूजा करतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच मुख्यमंत्री असेल. याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या मनातदेखील शंका नाही. अजित पवारांसारखं नेतृत्व या महाराष्ट्राला लाभो, हीच पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. पुढच्या आषाढी एकादशीला अजित पवारांच्या हस्ते पाडुरंगाची महापूजा घडो, अशी आमची अपेक्षा आहे” असंही अमोल मिटकरी म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.