Amol Mitkari | “प्रकाश आंबेडकरांच्या बोलण्यामागे मास्टरमाईंड कोण?”; अमोल मिटकरींचा परखड सवाल
Amol Mitkari | मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आजही भाजपसोबत असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं होतं. त्यावरून संपूर्ण राज्यात राजकीय चर्चेला उधाण आले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ‘त्यांचा बोलविता धनी कोण?’ असा प्रश्न विचारला आहे.
ते म्हणाले, “वंचित आघाडी महाविकास आघाडीचा भाग झाले आहे. अजित पवारांनीही वंचित महाविकास आघाडीत आल्यास आम्हाला कोणतीही अडचण नाही, असं सांगितलं आहे. आमच्या सर्वच घटक पक्षांनी त्यांचे स्वागत केलं. मात्र, आता त्यांनी जी मुलाखत दिली, दोन दिवसांनंतर दिलेली मुलाखत आहे.”
त्याचबरोबर मला खात्री आहे, की हे प्रकाश आंबेडकरांचे शब्द नाहीत. त्यामुळे त्यांना सांगणार मास्टरमाईंड कोण? हे पुढे आलं पाहिजे, असं अमोल मिटकरी म्हणालेत. पुढे ते म्हणाले, “बाळासाहेब हे साध्या स्वभावाचे आहेत. एकाद्या व्यक्तीच्या साध्या स्वभावाचा फायदा भाजपा घेऊ शकते. त्यामुळे त्यांना एकप्रकारे हिपनोटाईज केल्या सारखा प्रकार भाजपाकडून झाला असावा, अशी शक्यता नाकारता येत नाही.”
जितेंद्र आव्हाड यांचाही इशारा-
“महाविकास आघाडीमधील घटक पक्षातील नेतृत्वाने किंवा त्यांच्या मित्रपक्षातील नेतृत्वाने शरद पवार साहेबांबद्दल बोलताना आदराने बोलावं. मतभेद सगळ्यांचेच असतात, पण त्याच्यातून विष ओकलं जाऊ नये. हे पटण्यासारखं नाही. तेव्हा सगळ्यांनीच काळजी घ्यावी, अशी प्रतिक्रियाही जितेंद्र आव्हाड यांनी दिली. तसेच सत्तेसाठी वाट्टेल ते सहन करणार नाही”, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | “लोकशाहीत प्रत्येकाला…”; उद्धव ठाकरेंच्या ठाणे दौऱ्यावरुन मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
- Big Breaking | शिंदे-फडणवीसांची शपथ असंविधानिक; राजभवनकडून धक्कादायक खुलासा
- Jitendra Awhad | “शरद पवार आजही भाजपाबरोबर”; प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर जितेंद्र आव्हाड म्हणाले…
- Prakash Ambedkar | “शरद पवार आजही भाजपसोबत”; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
- Prakash Ambedkar | “आमची युती ठाकरेंशी, महाविकास आघाडीशी…”; प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने खळबळ
Comments are closed.