Amol Mitkari |”फडणवीसांच्या नादाला लागून आपण…” ; अमोल मिटकरींचा एकनाथ शिंदेंना टोला

मुंबई : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर आमदारांनी आधी सुरत आणि नंतर तेथून गुवाहाटी गाठले. अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे ४० आमदार आणि १० अपक्षांचा पाठिंबा आहे. शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत. दोघांनाही शपथ घेऊन १ महिन्याहून अधिक काळ लोटला असला तरी आजतागायत मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

अमोल मिटकरी म्हणाले, “शिंदे सरकारला ३५ दिवस पुर्ण. राज्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा कॅबिनेट विना एकहाती सरकार. या खेळात मात्र सामान्य जनता होरपळत चालली आहे. जे चालवलय ते बरे नाही शिंदे साहेब. फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य अधोगतीकडे नेत आहात.”

५ ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार होणार-

दरम्यान, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ५ ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. उद्या संध्याकाळी राजभवनात शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याबाबत संकेत दिले होते. राजभवणात तयारी देखील सुरु असल्याची माहिती आहे. यावेळी १५ आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

मंगळवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लवकरच आम्ही आमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत. पूर्ण मंत्रिमंडळ नसले तरी सरकार सक्षमपणे काम करत आहे. आम्ही असे अनेक निर्णय घेतले आहेत जे लोकाभिमुख आहेत. एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, मात्र महिना उलटूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरून विरोधी पक्षांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

शिंदे सरकारने महिनाभरात ७५१ सरकारी आदेश जारी केले-

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार एका महिन्यात झाला नसला तरी शिंदे सरकारने महिनाभरात ७५१ सरकारी आदेश जारी केले आहेत. यापैकी १०० हून अधिक आदेश एकट्या आरोग्य विभागाशी संबंधित आहेत. यापूर्वी शिवसेनेच्या बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने चार दिवसांत १८२ सरकारी आदेश जारी केले होते.

शिंदे सरकार विरोधकांच्या निशाण्यावर-

खरे तर सरकार स्थापन होऊनही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यास शिंदे यांचे सरकारही विरोधकांच्या निशाण्यावर आहे. मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने अनेकवेळा शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान शिंदे गटाने मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला तयार केला आहे. कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदे मिळणार याचा उल्लेख आहे.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.