Amol Mitkari | भगतसिंग कोश्यारींवर अमोल मिटकरींचा घणाघात, म्हणाले…

Amol Mitkari | मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मराठावाडा विद्यापीठातील कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासोबत केल्याच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापत आहे. अशातच राष्ट्रवादी (NCP) अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व छुप्या संघी समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या घृणास्पद वक्तव्याबद्दल तसेच सुधांशु त्रिवेदी या भाजप प्रवक्त्याने उधळलेल्या मुक्ताफळाबद्दल भाजप अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असं इशारा अमोल मिटकरी यांनी ट्विमद्वारे केला आहे.

यापुर्वी आव्हाड यांनी देखील कोश्यारींवर घणाघात केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली असे ते म्हणत आहेत. यांच्या बापाने यांना असा इतिहास शिकवला आहे का? शिवाजी महाराज यांच्या आयुष्यात एकच तह झाला. हा तह मिर्झा राजे जयसिंग यांच्याबरोबर झाला होता. त्याला पुरंदरचा तह म्हणतात. या तहातील वाटाघाटीनुसार ते औरंगजेबाच्या दरबारात गेले होते. तेथे झालेला अपमान सहन न झाल्यामुळे तहात जेवढे किल्ले गेले होते, त्यापेक्षा दुप्पट किल्ले शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडून घेतले होते. हे आहेत शिवाजी महाराज, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.