Amol Mitkari | “माझ्या जिवाचं काही बरं वाईट झालं, तर…”; अमोल मिटकरींचा शिंदे सरकारला इशारा

Amol Mitkari | मुंबई : राजकीय वर्तुळात हल्ली अनेक घडामोडी घडताना दिसून येतं आहेत. अशातच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीतील काही नेत्यांची सुरक्षा कपात करण्याचा निर्णय घेतला. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाला असून, सरकारवर हल्ला करत असल्याचं पाहायला मिळतं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले अमोल मिटकरी (Amol mitkari)

शिंदे-फडणवीस सरकारने आमची सुरक्षा काढली आहे. जर आमच्या जिवाचं काही बरं वाईट झालं किंवा काही अनुचित प्रकार घडला, तर याला सर्वस्वी जबाबदार शिंदे सरकार असेल, असा इशारा अमोल मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. अमोल मिटकरी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

मागील काही महिन्यांपूर्वी मला संशयास्पद गोष्टी जाणवल्या होत्या. त्यानंतर मी स्वत: महाराष्ट्र सरकारकडे सुरक्षेसाठी रितसर अर्ज केला होता. त्या अर्जानंतर गृहविभागाने ‘एक्स’ दर्जाची सुरक्षा मला नागपूर विभागाकडून दिली होती. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने राज्यात सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची सुरक्षा कपात केली आहे. मी एका प्रवृत्तीविरुद्ध लढणारा माणूस आहे. ज्या लोकांनी राज्यात सामाजिक सलोखा बिघडवला, त्याविरुद्ध मी सातत्याने लढा दिला आहे.

पुढे बोलताना अमोल मिटकरी असंही म्हणाले की, नागपूर विभागाच्या स्पेशल युनिट विभागाचा मला फोन आला आणि त्यांनी सुरक्षा कपात केल्याचे सांगितले. मी तिथल्या अधिकाऱ्यांना कारण विचारलं असता, त्यांनी कारण सांगण्यात नकार दिला. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या सुरक्षा काढून शिंदे गटाच्या नेत्यांना ही सुरक्षा देण्यात आली आहे. रवी राणांनाही विशेष सुरक्षा देण्यात आली आहे. मग आमची सुरक्षा का काढली? याचं कारण गृहविभागाने सांगावे.
महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.