Amol Mitkari | ‘रडरागिनी’ म्हणतं अमोल मिटकरी यांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल

Amol Mitkari | टीम महाराष्ट्र देशा: काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे एका कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. या कार्यक्रमामध्ये भाषण करताना सुषमा अंधारे भावूक झाल्या होत्या. पवारांबद्दल बोलत असताना त्यांना अश्रू रोखता आले नाही. त्यांच्या या भाषणानंतर अमोल मिटकरी यांनी सुषमा अंधारेंवरवर हल्लाबोल केला आहे. ‘रडरागिनी’ असा टोला मिटकरी यांनी अंधारे यांना लगावला आहे.

” सकाळी 6 पासून जनतेच्या सेवेत असणारे नेते म्हणजे अजितदादा. हल्ली अजित पवारांवर बोलनाऱ्यांचा नवा ट्रेंड आला आहे. दादांविरुद्ध बोललं की मीडियामध्ये प्रसिद्धी मिळते”, या शब्दांमध्ये अमोल मिटकरी यांनी सुषमा अंधारेंवर हल्लाबोल केला आहे.

शरद पवार यांनी 2 मे रोजी अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे पवारांनी राजीनामा माघारी घेतला. यावेळी सुषमा अंधारे यांनी देखील शरद पवारांना पत्र पाठवलं होतं. ते पत्र सुषमा अंधारे यांनी शरद पवारांना वाचून दाखवलं. हे पत्र वाचताना त्यांना त्यांचे अश्रू आवरता आले नाही.

सातारा येथे भारतीय भटके विमुक्त विकास संशोधन संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुषमा अंधारे आणि शरद पवार यांची उपस्थिती होती. यावेळी अंधारे यांनी पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र वाचून दाखवलं. हे पत्र वाचताना त्यांना अश्रू आवरता आले नाही. रडतच त्यांनी ते पत्र वाचून दाखवलं. यानंतर ‘रडायची सुद्धा हेडलाईन होऊ शकते’, असं म्हणतं अमोल मिटकरी यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like