Amol Mitkari | “रवी राणा यांना जिल्हाबंदी का केली नाही?”; अमोल मिटकरी यांचा खोचक सवाल
Amol Mitkari | शिर्डी : राष्ट्रवादी काँग्रेसचं मंथन शिबिर शिर्डीमध्ये पार पडत आहे. पुढच्या वर्षी विठ्ठलाची महापूजा ही महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री करतील, असं ट्वीट राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलंय. पुढे ते म्हणाले, आगामी आषाढी एकादशीला महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीच पांडुरंगाची शासकीय महापूजा करतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच मुख्यमंत्री असेल. याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या मनातदेखील शंका नाही. अजित पवारांसारखं नेतृत्व या महाराष्ट्राला लाभो, हीच पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. पुढच्या आषाढी एकादशीला अजित पवारांच्या हस्ते पाडुरंगाची महापूजा घडो, अशी आमची अपेक्षा आहे” असंही अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणालेत.
हे सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय. ते म्हणाले, हे सरकार नियमावली पाळत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्याचं उल्लंघन कुणी करत असेल, तर ठीक आहे. गुलाबराव पाटील हे जास्त प्रक्षोभक बोलतात. त्या तुलनेत शरद कोळी हे तेवढे प्रक्षोभक बोलले नाहीत. तरीही त्यांच्यावर जिल्हाबंदी आणली.
आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी कोथळा काढण्याची भाषा केली. त्यांच्यावर मात्र अमरावतीत का बंदी घातली नाही? असा सवाल अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे. शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रांना शिंदे-फडणवीस सरकार घाबरलेलं आहे. जिल्हाबंदी करून कुणाचा आवाज दाबता येणार नाही. उलट जास्त उद्रेक होईल, असा इशारा त्यांनी दिलाय.
मिटकरी म्हणाले, ज्या-ज्या वेळी आषाढी कार्तिकी किंवा पंधरवाडा एकादशीचा योग आला, तेव्हा-तेव्हा राज्यात बरंच मोठं परिवर्तन घडलं. महाराष्ट्रातील जनतेच्या विशेषत: शेतकऱ्यांच्या मनात शिंदे-फडणवीस सरकारबद्दल प्रचंड रोष असल्याचं मिटकरी यावेळी बोलताना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | “सध्या सरकारचा ‘रेटून बोल पण खोटं बोल’ हा धंदा..”; अजित पवारांची सडकून टीका
- Amol Mitkari | “पुढच्या आषाढी एकादशीला मविआचा मुख्यमंत्री…”;अमोल मिटकरींचं मोठं विधान
- Winter Hair Care | ‘या’ टिप्स फॉलो करून हिवाळ्यात केस गळतीची समस्या करा दूर
- Ajit Pawar । राष्ट्रवादी खरंच फुटणार का?; अजित पवार म्हणाले…
- Vinayak Raut | हे गतिमान सरकार नसून स्थगिती सरकार आहे – विनायक राऊत
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.