Amol Mitkari | राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदी यांची भाजपकडून पाठराखण, अमोल मिटकरी संतापले

Amol Mitkari | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या वक्तव्यामुळे भाजप बॅकफूटवर आली आहे. या दोघांच्या वक्तव्यावर भाजपचे बहुतांश नेते मौन बाळगून आहेत. या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते चांगलेच आक्रमक असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या दोघांचीही पाठराखण केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी देखील यावर गोलमाल उत्तरे दिली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी टीका केली आहे.

अमोल मिटकरी म्हणाले, “राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली पाठराखण निश्चितच प्रत्येक शिवप्रेमींना दुःखदायक वाटणारी आहे. त्यांच्या भूमिकेचे समर्थन कशासाठी?”

विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील कोश्यारींवर निशाणा साधला आहे. ३ वर्षे महाराष्ट्रात राहूनही राज्यपालांना महाराष्ट्रातील जनतेच्या भावना समजत नसतील तर त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी राहू नये, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जोपर्यंत सूर्य, चंद्र आणि पृथ्वी आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे, देशाचे आणि आपल्या सर्वांचे आदर्श राहतील. आजच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज आमचे हिरो आहेत. याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. याबाबत राज्यपालांच्या मनात काही शंका असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे राज्यपालांच्या शब्दांचा निश्चितच चुकीचा अर्थ काढला गेला आहे, असे मला वाटते.

त्याचबरोबर सुधांशू त्रिवेदींच्या वक्तव्यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, मी त्रिवेदी यांचे वक्तव्य नीट ऐकले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली आहे, त्यावर ते काहीही बोलला नाही.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.