Amol Mitkari | “सुधांशू त्रिवेदी ज्या दिवशी महाराष्ट्रात येतील… ”; शिवरायांबाबत केलेल्या विधानावरून अमोल मिटकरी आक्रमक

Amol Mitkari | मुंबई : इतिहास आणि त्याबद्दल नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या विधानानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत असतानाच आता भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी शिवरायांबद्दल केलेलं विधान सध्या चर्चेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली असल्याचं ते म्हणालेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

“भाजपाने विषयावर तोंड उघडावं, याबद्दल त्यांची काय भूमिका आहे, ते भाजपाने स्पष्ट सांगावे. राज्यापालांनी जे बेताल वक्तव्य केलं आहे, त्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात रोष असल्याचं सांगत भाजपाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी अमोल मिटकरींनी केली आहे. “नाहीतर अशा बेताल वक्तव्य करणारे सुधांशू त्रिवेदी ज्या दिवशी महाराष्ट्रात येईल, त्यावेळी चप्पलेने त्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही”, असा इशाराही त्यांनी भाजपाला दिला आहे.

ते म्हणाले, “भाजपाचे वादग्रस्त प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी अक्कलेचे तारे तोडताना सावरकरांच्या माफीनाम्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याशी केली आहे. इतिहासानुसार मिर्जाराजे जयसिंगांबरोबर तहाची बोलणी असेल किंवा अफजल खानाशी झालेला पत्रव्यवहार असेल, हा गनिमी काव्याचा भाग होता.”

महाराज जसे दोन पालवं मागे आले, त्यानंतर त्यांनी शत्रूंवर तितक्याच ताकदीने हल्लाही केला. मात्र, सावरकर बाहेर आल्यानंतर त्यांनी इंग्रजांविरोधात कोणतेही बंड केलं नाही, असा इतिहास सांगतो. त्यामुळे सावरकरांच्या पत्राची तुलना शिवाजी महाराजांच्या पत्रांशी करणं हा केवळ मुर्खपणा असल्याचं अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.