Amol Mitkari । “शिंदे-फडणवीस सरकारनं लक्षात ठेवावं की चार दिवस सासूचे आणि चार दिवस सूनेचे असतात” : अमोल मिटकरी

Amol Mitkari । मुंबई : आज २० एप्रिलला बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होत यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अकोल्यातील पाणीपुरवठा योजनेवरील स्थगिती उठवण्याच्या मागणीसाठी नितीन देशमुख यांनी अकोला ते नागपूर अशी ‘जलसंघर्ष’ यात्रा काढली होती. ही यात्रा आज नागपूरमध्ये दाखल होणार होती. परंतु पोलिसांनी त्यांची ‘जलसंघर्ष’ यात्रा मध्येच अडवली आणि नितीन देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकारावरून महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेत सरकारवर हल्लाबोल केला आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

काय म्हणाले अमोल मिटकरी? (What did Amol Mitkari say)

माध्यमांशी संवाद साधताना अमोल मिटकरी म्हणाले की, जेव्हापासून शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आले, तेव्हापासून लोकशाही संपली आणि सैतानी साम्राज्याचा उदय झाला. यांच जिवंत उदाहरण आज बघायला मिळालं. नितीन देशमुख यांनी पिण्याच्या पाण्यासाठी अकोला ते नागपूर पायी संघर्ष यात्रा काढली तरीही त्यांच्यावर बेकायदेशीरपणे कारवाई करण्यात आली. त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक केली गेली. हीच सैतानी साम्राज्याची सुरुवात आहे. पण शिंदे-फडणवीस सरकारने हे लक्षात ठेवावं की चार दिवस सासूचे आणि चार दिवस सूनेचे असतात. ज्या दिवशी महाविकास आघाडी सत्तेत येईल, तेव्हा हिशोब केला जाईल, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली. तसचं सत्ताधारी विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी देखील शिंदे सरकारवर टीका केले आहेत. बाळापूर भागातील तीन महिन्याचं बाळही खारयुक्त पाणी पिते. या पाण्यामुळे लोकांचं जीवन संकाटत आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पाण्याची योजना मंजूर केली होती. परंतु, या योजनेला फडणवीसांनी स्थगिती आणली. नितीन देशमुख हेच खारयुक्त पाणी फडणवीसांना दाखवण्यासाठी नागरपूरला जात होते पण सरकारने त्यांना अडवलं. राज्यात नेमकं चाललंय काय? हे सरकार मोगलाई परत आणताय का? असा सवाल देखील त्यांनी सरकारला विचारला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सध्या नितीन देशमुख यांना ताब्यात घेतलेल्या प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. तर आगामी निवडणुकीत याचा फटका भाजप आणि शिंदे गटाला देखील बसेल असं मत मांडलं जातं आहे.

महत्वाच्या बातम्या-