“पवार साहेबांची उंची गाठायला सात जन्म वाट बघा”; अमोल मिटकरींचा सदाभाऊंवर निशाणा

मुंबई : हॉटेलची उधारी द्या, मग पुढच्या कार्यक्रमाला जा.असे म्हणत मांजरी येथील हॉटेल मालक व शेतकरी संघटनेच्या माजी पदाधिकाऱ्याने माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना अडवल्याचा प्रकार घडला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे पंचायत समितीच्या आवारातच हा प्रकार घडल्याने सर्वांचा काही काळ गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनूसार सांगोला तालुक्यांमध्ये आज पंचायत राज समितीचे पथक दौऱ्यासाठी आले होते.

यावेळी सदाभाऊ गाडीतून उतरताच ‘भाऊ, तुमचे तालुक्यात स्वागत. परंतु 2014 च्या निवडणुकीचे माझी अगोदर उधारी द्या. मग तुम्ही पुढील कार्यक्रमासाठी जावा. आधी आमचा निर्णय लावा. तुम्ही फोनही घेत नाही आणि घेतला तरी व्यवस्थितही बोलत नाही.’ असे म्हणू लागले आता यावर सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकारानंतर सदाभाऊ खोत यांनी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव असल्याची टीका केली होती.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सदाभाऊंना खोचक टोला लगावला आहे. “पोट फुटेस्तोवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या. तुमच्यामुळे त्या हॉटेल मालकाच्या जिवाला धोका निर्माण होतोय, अशी सगळीकडे चर्चा आहे. शेतकऱ्यांसाठी पोट फुटेस्तवर आंदोलन करा, आणि पवार साहेबांची उंची गाठायला आणखी सात जन्म वाट बघा”, असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा