अमरावतीत शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला, नवनीत राणा, रवी राणांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

अमरावती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून अमरावतीत राजकारण चांगलेच तापले आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी अपक्ष आमदार रवी राणा यांनी अमरावतीमधील राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांच पुतळा बसवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आता महानगरपालिकने हटवला आहे.

शिवरायांचा हा पुतळा आमदार रवी राणा यांनी विना परवानगी बसविला होता. अमरावती महानगरपालिकेने केलेल्या दाव्यानुसार हा पुतळा परवानगी न घेता उभारण्यात आला होता. त्यामुळे यावर कारवाई करण्यात आली . त्यामुळे राणा दाम्पत्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यादरम्यान खासदार नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये वाद पेटला होता.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद चिघळणार असल्याचे चित्र आहे. यानंतर आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर पोलीस आणि एसआरपीएफचा मोठा बंदोबस्त लावून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या पुतळ्याला महापालिकेने परवानगी द्यावी अशी मागणी आमदार रवी राणा यांनी दोन दिवसांपूर्वी महापालिकेत केली होती.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा