Amruta Fadanvis | “पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे नवे राष्ट्रपिता…”; अमृता फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

Amruta Fadanvis | नागपूर : महापुरुषांबाबत केलेल्या विधानांवरून भाजप नेत्यांवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी मोठं विधान केलं आहे. महात्मा गांधी राष्ट्रपिता होते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे भारताचे नवीन राष्ट्रपिता आहे. असं त्या म्हणाल्या आहेत. अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर नवीन वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नागपूर येथे अभिरूप कोर्टाच्या एका कार्यक्रमाला अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या वेळी अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना भारताचे नवीन राष्ट्रपती असा उल्लेख केला. नरेंद्र मोदींचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केल्यानंतर मुलाखतकाराने महात्मा गांधी कोण? असा सवाल अमृता फडणवीस यांना केला. त्यावर अमृता फडणवीस उत्तर देत म्हणाल्या की,”महात्मा गांधी हे आपल्या देशाचे राष्ट्रपिता आहेत. तर, नरेंद्र मोदी हे देखील भारताचे नवीन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे तत्कालीन राष्ट्रपिता होते.” अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे खळबळ उडाली होती. दरम्यान, अमृता फडणवीस यांनी राज्यपालाचा बचाव केला होता.

राज्यपाल भगतसिंग कौशल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. त्याचबरोबर त्यांनी राजीनामा द्यावा असा देखील जोर धरला होता. साताऱ्याचे खासदार उदयसिंग राजे भोसले यांनी देखील त्यांच्या या वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त केला होता. तर, दुसरीकडे विरोधी पक्षाने म्हणजेच महाविकास आघाडीने देखील राज्यपालांनी राजीनामा देण्याची मागणी लावून धरली होती.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.