Amruta Fadanvis | शिवरायांबाबत केलेल्या विधानावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Amruta Fadanvis | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावेळी त्यांनी महाराजांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत केली होती. याची पाठराखण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी केली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे मराठी माणसांविषयी, मराठी भाषेवर खूप प्रेम आहे. मात्र, अनेकदा त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात येतो, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

दरम्यान, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल हे एकमेव राज्यपाल आहेत. जे महाराष्ट्रात येऊन मराठी भाषा शिकलेत. मराठी माणसांवर त्यांचे खूप प्रेम आहे. हे मी स्वत: अनुभवलं आहे. मात्र, अनेक वेळा त्यांच्या भाषणाचा चुकी अर्थ काढण्यात येतो. यापूर्वीही असं अनेकदा घडलं आहे. मात्र, त्यांचे महाराष्ट्रावर प्रेम आहे, निश्चित आहे, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पतंजलि योगपीठ आणि मुंबई महिला पतंजलि योग समितीच्यावतीने शुक्रवारी योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन ठाण्यातील हायलँड भागात करण्यात आलं होतं. या संमेलनास अमृता फडणवीस यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना कोश्यारी यांच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला असता, त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.