Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांना ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न; उल्हासनगर पोलिसांनी तरुणीला ठोकल्या बेड्या
Amruta Fadnavis | मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना १ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाला असल्या प्रकरणी मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने ही बातमी छापल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
विविध गुन्ह्यात फरार असलेला माजी नगरसेवक अनिल जयसिंघानी यांच्यावरील गुन्हे आणि आरोप मागे घेण्यासाठी जयसिंघानी यांची मुलगी अनिक्षा हिने थेट अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी गुरुवारी दुपारी पोलिसांनी तिला अटक करण्यात आली आहे.
अनिक्षा जयसिंघानी पोलिसांच्या ताब्यात | Aniksha Jaisinghani in police custody
अमृता फडणवीसांनी आज सकाळी मलबार हिल पोलीस ठाण्यात डिझायनर अनिक्षा जयसिंघानी ( Designer Aniksha Anil Jaisinghani ) आणि अनिल जयसिंघानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. संशयित आरोपी अनिक्षा आणि अनिल हे दोघेही अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करत होते.
देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली माहिती
याबाबतची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत देताच मलबार हिल पोलीस अनिल जयसिंघानी यांच्या उल्हासनगर येथील घरी पोहोचले. पोलिसांनी अपार्टमेंटमध्येच अनिक्षाची सुमारे सहा तास चौकशी केली. या चौकशीनंतर मलबार हिल पोलिसांनी अनिक्षाला अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
अमृता देवेंद्र फडणवीसांना ब्लॅकमेलिंग करणाऱ्या तरुणीला अटक
“संशयित आरोपी अनिक्षा सुमारे १६ महिने अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती. ती माझ्या घरीही आली होती. अनिक्षा आणि माझी पहिली भेट नोव्हेंबर २०२१ मध्ये झाली”, असं अमृता फडणवीस यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
“मी विधानसभेत निवेदन दिलं आहे. माझी पत्नी अमृता फडणवीस यांनी एक एफआयआर दाखल केलं आहे ज्यामध्ये त्यांच्यामाध्यमातून भ्रष्टाचार आणि ब्लॅकमेल करुन दबाव तयार करुन आपले केसेस मागे घ्यायचे, भ्रष्टाचार करायचे प्रयत्न केले गेले. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे”, अशी देखील माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
Young woman arrested for blackmailing Amruta Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या-
- Amruta Fadnavis | ‘मॅडम चतुर…औकात..’; १ कोटी ऑफरवरुन अमृता फडणवीस-प्रियंका चतुर्वेदींमध्ये ट्विटरवॉर
- Rahul Gandhi | “मी भाजपच्या आरोपाला संसदेतच उत्तर देणार”; राहुल गांधींचं ‘त्या’ भाषणाबाबत वक्तव्य
- Shivsena | “मुख्यमंत्रिपदासाठी ठाकरे सरकार पाडलं, बेईमानीचं बक्षीस म्हणून त्यांना मुख्यमंत्री बनवलं”
- Nana Patole | “देशाला उद्ध्वस्त करणारी व्यवस्था म्हणजे भाजप, त्यांना सत्तेबाहेर करणं महत्वाचं”-नाना पटोले
- Nana Patole | “माझं नाव नाना आहे दादा नाही”; नाना पटोलेंच्या वक्तव्यावरुन चर्चेला उधाण
Comments are closed.