Amruta Fadnavis | ‘आधी कुंकू लाव, मगच बोलतो’, संभाजी भिडेंच्या विधानावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…
Amruta Fadnavis | पंढरपूर : काल (गुरूवार) संभाजी भिडे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने संभाजी भिंडे (Sambhaji Bhide) यांना प्रश्न विचारला, “तुम्ही आज मंत्रालयात कोणाची भेट घेतली?,” यावर “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही आहे, असं भिडे यांनी म्हटलं. अशातच भिडेंच्या विधनावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या अमृता फडणवीस (Amruta Fadnavis)
माझ्या मनात भिडे गुरुजींबद्दल आदर आहे. ते हिंदुत्त्वाचे स्तंभ आहेत. पण मला असं वाटतं, महिलांनी कसं जगावं हे कोणी सांगू नये, तिची एक जीवनशैली असते, त्याप्रकारे ती जीवन जगत असते, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. अमृता फडणवीस कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात आल्या असताना, त्यावेळी त्यांनी माध्यमांंशी संवाद साधला.
दरम्यान, संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना त्यांना महिला आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १९९३ अंतर्गत कलम १० (१) (फ) (एक) व (२) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्विकारणे आणि त्या बाबींची स्वाधिकारी दखल घेणे याकरीता प्राधिकृत करण्यात आले आहे.
तसेच,महिला पत्रकाराने कपाळावर टिकली लावली नाही म्हणून आपण तिच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. स्त्रीचा दर्जा तिच्या कर्तुत्वाने सिद्ध होत असतो. आपले वक्तव्य स्त्री सन्मानाला आणि समाजिक दर्जाला ठेच पोहचविणारे आहे, असं नोटीसमध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadanvis । “ते कोणाची चाकरी करतात हे सर्वांना माहिती आहे”; जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचा पलटवार
- Sushma Andhare | बच्चू कडू-राणा वादावर सुषमा अंधारे म्हणाल्या, “बच्चू कडूंची कारकीर्द…”
- Winter Care Tips | ‘या’ टीप्स फॉलो करून हिवाळ्यात रहा निरोगी
- Imran Khan । इम्रान खान यांच्यावर जीवघेणा हल्ला, पाकिस्तानात खळबळ
- Skin Care Tips | टोमॅटोचा वापर करून चेहऱ्यावरील ‘या’ समस्येपासून मिळेल सुटका
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.