Amruta Fadnavis । “कर्नाटक निवडणूक नाही जिंकली, तरी लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदीचं जिंकतील” : अमृता फडणवीस
Amruta Fadnavis । नागपूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अनेकांनी आपआपली मत नोंदवत प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजपला (BJP) धूळ चारत काँग्रेसने (Congress) कर्नाटकात बाजी मारली आहे. यामुळे काँगेसकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. तर याबाबत देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी याबाबत प्रतिक्रिया देत आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी बाजी मारणार असं वक्तव्य केलं आहे.
काल आम्ही होतो, आज काँग्रेस तर उद्या दुसरं कोणी असेल : अमृता फडणवीस
माध्यमांशी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की मला जास्त काही राजकीय बोलायचं नाही. पण जे काही कर्नाटक निवडणुकीचा निकाल आला तो ही चांगली गोष्ट आहे, हेल्दी गोष्ट आहे. प्रत्येक पार्टीला कर्नाटकची जनता संधी देत आहे. काल आम्ही होतो. आज काँग्रेस आहे. उद्या अजून कोणी राहील. कर्नाटकसाठी चांगली गोष्टी आहे. काही इश्यू नाही. तसचं त्यांनी आजून एक भाष्य केलं ते म्हणजे,आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच निवडणूक जिंकतील. याचा सर्वांना विश्वास आहे. तसचं याबाबत देवेंद्रजींनी देखील सांगितलं आहे असं अमृता फडणवीस म्हणाल्या .
दरम्यान, अमृता फडणवीस यांनी उद्या सर्वत्र साजरी होणाऱ्या मदर्स डे बद्दल सांगितलं की, मदर्स डे हा खूपच सुंदर असा दिवस आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग तारी असं म्हणतात. परंतु मला असं वाटतं,आईचं आहे जी पुढचं भविष्य घडवते. कर्तुत्ववान आईला माझ्याकडून आणि सर्वांकडून सलाम. अशा शब्दांत त्यांनी आईच महत्त्व सांगितलं .
महत्वाच्या बातम्या-
- Aditya Thackeray | सत्तासंघर्षाच्या निकालानंतर आदित्य ठाकरे दिल्लीत ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- Sharad Pawar | कर्नाटकमधील राष्ट्रवादीच्या पराभवावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Uddhav Thackeray | “हा देशातील हुकूमशाहीचा पराभव…”; कर्नाटक निवडणूक निकालावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
- Karanatka Election Result | हा लढा भ्रष्टाचाराविरोध होता : विजयानंतर डीके शिवकुमार यांची प्रतिक्रिया
- Eknath Shinde | ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला नेमका कुणाला?
Comments are closed.