InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मराठा क्रांती मोर्चा- ‘त्या’ वादग्रस्त व्यंगचित्राप्रकरणी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या विरोधात अटक वॉरंट?

मराठा क्रांती मोर्चा काळात शिवसेना मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘दै. सामना’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या वादग्रस्त व्यंगचित्र प्रकरणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत तसेच, व्‍यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि राजेंद्र भागवत यांच्‍याविरुद्ध वॉरंट जारी करण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली आहे. आरोपी हे अनेकदा समन्स बजाऊनही न्यायालयात उपस्थित राहात नसल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करावे असे या प्रकरणात खटला सुरु असलेल्या पुसद न्यायालयाकडे फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयाकडे मागणी केली आहे.

मराठा क्रांती मोर्चा हा मूक पद्धतीने काढण्यात आला होता. हसोबा प्रसन्न या सदरात ‘मुका मोर्चा’ असा शब्दच्छल करत व्यंगचित्र प्रसिद्ध झाले होते.

‘हे’ व्यंगचित्र सामनामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्रात जोरदार पडसाद उमटले होते. मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा आंदोलकही आक्रमक झाले होते. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाचे मुख्य संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कार्यकारी संपादक म्हणून मराठा समाजाची भावना दुखावली गेल्याबद्दल माफीही मागितली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply