Ananya Pandey | अनन्या पांडे साजरा करत आहे आज तिचा वाढदिवस, वयाच्या 24 व्या वर्षी आहे ती एवढ्या संपत्तीची मालकीण

मुंबई: स्टुडन्ट ऑफ द इयर 2 (Student of the Year) या चित्रपटात द्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारी अनन्या पांडे (Ananya Pandey) ने फार कमी वेळेतच बॉलीवूड (Bollywood) मध्ये आपला ठसा उमटवला आहे. अनन्याला तिच्या वडिलांकडून अभिनयाचा वारसा मिळाला आहे. अनन्या पांडेचे वडील चंकी पांडे हे त्यांच्या काळातील एक उत्तम अभिनेते होते. अनन्या पांडेची गणना बॉलीवूड मधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री मध्ये केली जाते. अनन्या आज तिचा 24 वा वाढदिवस (Birthday) साजरा करत आहे. वयाच्या 24 व्या वर्षी अनन्यांनी कमावलेली संपत्ती पाहून तुम्ही थक्क व्हाल.

अनन्या पांडे चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यापासून ती चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी अनन्या पांडे कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. अनन्याची एकूण संपत्ती बघून तुम्ही थक्क व्हाल. अनन्या तिच्या चित्रपट आणि जाहिरातींच्या माध्यमातून कमाई करते. ती तिच्या चित्रपट आणि जाहिरातींसाठी लाखोंमध्ये मानधन घेते. नुकत्याच समोर आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार, अनन्या पांडे 30 कोटींपेक्षा जास्त संपत्तीची मालकीण आहे.

वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी अनन्या पांडे Ananya Pandey चे आहे स्वतःचे आलिशान घर

वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी अनन्या पांडेचे मुंबईमध्ये पाली हिल येथे स्वतःचे आलीशान घर आहे. या घरामध्ये अनन्या तिच्या कुटुंबासोबत राहते. या घराला अनन्याने सर्व आवश्यक सुविधांनी सुसज्ज केले असून या घराची किंमत करोडो मध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.

रिपोर्टनुसार, अनन्या पांडेला लक्झरी कारची देखील खूप आवड आहे. अनन्याकडे उत्तम कार कलेक्शन आहे. यामध्ये 88.24 लाख रुपयांची ‘रेंज रोवर स्पोर्ट्स’, 63.30 लाख रुपयांची ‘मर्सिडीज बेंज ई-क्लास’, 33 लाख रुपयांची ‘स्कोडा कोडियाक’ इत्यादी गाड्यांचा समावेश आहे.

इंस्टाग्रामद्वारे अनन्या चाहत्यांना देत असते तिचे अपडेट

अनन्या पांडे तिचा बराचसा वेळ इंस्टाग्राम वरच्या चाहत्यांसोबत घालवताना दिसत असते. अनन्या तिच्या चाहत्यांसाठी रोज एक फोटो किंवा व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर करते. तिचे चाहते ही तिची ही एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. अनन्या पांडेचे इंस्टाग्राम वर तब्बल 24 मिलियन फॉलोवर्स आहेत.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.