अनन्या पांडेची आज पुन्हा NCB करणार चौकशी!

मुंबई : क्रूझ ड्रग्जपार्टी प्रकरणात बॉलिवूडमधील अभिनेत्री अनन्या पांडेची एनसीबीकडून काल (गुरुवार) दुपारी २ तास चौकशी करण्यात आली. पण काल चौकशी पूर्ण झाली नसल्यामुळे अनन्याला आज एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

कालच्या अनन्याच्या चौकशी दरम्यान एनडीपीएस कोर्टाने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली. ३० ऑक्टोबरपर्यंत आर्यनला न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे अनन्याची चौकशी करत असून यामध्ये एनसीबीचे इतर अधिकारी व्ही.व्ही सिंह आणि एक महिला अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.

येत्या मंगळवारी २६ ऑक्टोबरला आर्यन खानसोबत अटकेत असलेल्या मुनमून धमेचा या दोघांच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे येत्या मंगळवारी आर्यनला जामीन मिळतो की नाही याकडे सगळ्याचे लक्ष्य लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा