राम मंदिराचा कारभार पारदर्शक ठेवण्यासाठी अराजकीय समिती नेमा; जयंत पाटील

मुंबई : राम मंदिर बांधण्यासाठी जमा केल्या जाणाऱ्या निधीत भ्रष्टाचार होत असल्यास ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा जयंत पाटील यांनी दिली. राममंदिर उभारणीसाठी गोळा होणारा पैसा पारदर्शीपणाने खर्च होतोय की नाही हे बघण्यासाठी देशातील रामभक्तांनी एक अराजकीय समिती स्थापन करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

मंदिराचं पावित्र्य राखून प्रामाणिकपणे राममंदिर उभं राहावं अशी रामभक्तांची अपेक्षा आहे. त्यामुळे या समितीने राममंदिर उभारणीतील खर्च, जमाखर्च आणि त्याचा हिशोब हा तटस्थ गटाच्या निरीक्षणाखाली ठेवावा. राममंदिरासाठी देशातील रामभक्त मोठ्या प्रमाणावर देणगी देत आहेत.

पण या निधीत लोक भ्रष्टाचार करत असतील तर राम यांच्यापासून किती लांब आहे आणि रामापासून ते किती लांब आहेत हे स्पष्ट होते. रामनामाचा वापर करून विविध राजकीय आणि आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न काही लोक करत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी यावेळी केली.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा