अन् अजित पवार म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब, नेमकं काय घडलं?
मुंबई : कोविडचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात धुमाकुळ माजवत आहे. सध्या देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत कठोर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. संपूर्ण लॉकडाउन नाही तर, मिनी लॉकडाउन लागू शकतो, अशी दाट शक्यता आहे, असं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गेल्या आठवड्यात केलं होत.
यावेळी टोपेंनी कोरोना परिस्थितीचा आढाव्या घेतल्यानंतर कोरोना स्थितीची माहिती पत्रकार परिषद दिली. या पत्रकार परिषदेत त्यांनी लॉकडाऊनबाबत मोठं विधान केलं आहे. राज्याला आज ऑक्सिजनची मागणी ४०० मेट्रीक टन इतकी आहे. यापैकी 250 नॉन कोविड आणि 150 मेट्रीक टन कोविड रुग्णांसाठी लागत आहे. ऑक्सिजनची मागणी 700 मेट्रीक टनवर गेली, की आपण लॉकडाऊन लावणार आहोत, असं टोपेंनी ठणकावून सांगितलं होत.
यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना एक मोठे वक्तव्य केले आहे. नागरीकांच्या जीवाशी खेळ करुन चालणार नाही. रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी सरकारनं सुरु केलेली आहे. पण जर ऑक्सिजनची मागणी वाढली, तर मात्र निर्बंध वाढवण्यासंबंधीचा निर्णय, राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब घेतील, असे अजित पवार म्हणाले आहेत.
तसेच या पत्रकार परिषदेत बोलण्याच्या ओघात अजित पवारांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून केला असावा, असाही तर्क आता काढला जातो आहे. मात्र त्यांच्या या विधानामुळे आता वेगळ्याच चर्चांना उधान येण्याची शक्यता आहे. तसेच या वक्तव्याने भविष्यात मुख्यमंत्रीपदाची सूत्रे आदित्य ठाकरेंकडे जाणार का असा चर्चांना देखील आता वाव मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- गोव्यात काँग्रेस शिवसेनेला विचारायला तयार नाही, प्रविण दरेकरांचा संजय राऊतांना टोला
- काँग्रेसला गोव्यात ४० पैकी ४५ जागा मिळतील! महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्यानंतर राऊतांचा संताप
- “आपल्या मतदारसंघातील रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार”; काँग्रेस आमदाराचं वादग्रस्त विधान
- ‘महाराष्ट्र सोडून फडवणीस गोव्यात व्यस्त असतील, तर विरोधी पक्ष नेत्याचा चार्ज कुणाकडे द्यायला हवा?’
- “नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही…”, फडणवीसांची शरद पवारांवर सणसणीत टीका