…आणि जिममध्येच ह्रतिक रोशन गरबा खेळू लागला, व्हिडीओ व्हायरल!

मुंबई : बॉलीवूड अभिनेता ह्रतिक रोशनचा नुकताच त्याचा जिममधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र ह्रतिकचा व्हायरल झालेला जिममधील हा व्हिडीओ त्याच्या वर्कआउटचा नसून त्याच्या डान्सचा आहे.

ह्रतिक रोशनने त्याच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर जिममधील काही व्हिडीओ शेअर केले आहेत. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये तो म्हणाला, “जेव्हा एखादा बॉलिवूड हिरो जिममध्ये अचानक ८०च्या दशकातील गाणी ऐकतो”.

यातील पहिल्या व्हिड़ीओत ह्रतिक गरबा खेळताना दिसतोय. तर पुढे ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातील ‘जानू मेरी जान’ या गाण्यावर त्याने ठेका धरला आहे. तर शेवटच्या व्हिडीओत तो मिथुन चक्रवर्ती यांच्या ‘जिमी जिमी आजा आजा’ या गाण्यावर डान्स करत आहे. ह्रतिकच्या या व्हिडीओजना चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी पसंती दिलीय.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा