…आणि म्हणून मुलाने घेतला वडिलांच्या शरीराचा चावा, वाचा धक्कादायक प्रकार 

मटणाच्या भाजीत पालक टाकल्याच्या कारणावरून २१ वर्षीय व्यसनी मुलाने चक्क वडिलांचा अंगठा, पाय आणि पोटरीवर चावा घेऊन, त्यांना गंभीर जखमी केले आहे . तसेच आईचे केस धरून, तिला जमिनीवर आपटल्याची घटना घडली आहे. मुलाच्या हल्ल्यात आई-वडील दोघेही गंभीर जखमी झाले असून,याबाबत वडिलांनी पोलिसात तक्रार केली होती. यानंतर तातडीने पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.

इम्रान खान म्हणजे दहशतवाद्यांचे ‘रोल मॉडल’, माजी क्रिकेटपटूचा गंभीर आरोप

विजय धर्मा सनादे (वय २१,येरवडा) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,या मुलाचे वडील सनादे खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहेत, तरआई धुण्याभांड्यांचे काम करून पैसे मिळवतात.  त्यांना दोन मुले आणि सून आहे. धाकटा मुलगा विजय व्यसनी असून, बेरोजगार आहे.

Loading...

मनसेचा नवा झेंडा पाहिलात का?

रात्री कामावरून आल्यावर वडील धर्मा यांनी घरी मटणाची भाजी केली. मटणाच्या भाजीत पालक टाकल्याने मुलगा विजयला राग अनावर झाला. त्यामुळे त्याने वडिलांच्या हाताच्या डाव्या अंगठ्याला, पायाला पोटरीवर जोराने चावा घेऊन गंभीर जखमी केले.तसेच वडिलांना सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या आईचेही केस धरून, मुलाने तिला जमिनीवर आपटले. त्यामुळे आईच्या डोक्याला सूज आली. सध्या हा मुलगा पोलिसांच्या ताब्यात आहे.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.