Andheri by-election | उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ? ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने फेटाळला

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा फेटाळण्यात आल्याने आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच उद्धव ठाकरे गट न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे. आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे.

ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने फेटाळला –

काही वेळापुर्वी महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या ऋतुजा लटके शिवसेनेतील नेत्यांसोबत महापालिकेमध्ये गेल्या होत्या. यावेळी आजच आपला राजीनामा स्वीकारावा अशी विनंती लटकेंनी केली होती. मात्र, महापालिकेने ही विनंती फेटाळत राजीनामा देखील फेटाळला आहे. अंधेरी पोटनिवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.

मुंबई महापालिकेत ऋतुजा लटके कार्यरत आहेत. पोटनिवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आपल्या शासकीय नोकरीचा राजीनामा दिला. मात्र अदयाप त्यांचा राजीनामा स्वीकार करण्यात आलेला नाही. त्यामुळे शिवसेनेतील नेत्यांची धावपळ सुरु होती. अशातच राजीनामा फेटाळल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट न्यायालयात धाव घेऊ शकतो.

निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून ऋतुजा लटके तर भाजपकडून माजी नगरसेवक मुरजी पटेल यांच्यात मुख्य लढत होणार आहे. मात्र, मुरजी पटेल माघार घेणार असल्याचं म्हटलं जातं आहे. पोटनिवडणुकीवरून राजकीय रणनीती पाहायला मिळत आहे.
ऋतुजा लटके यांना आपल्याकडे आणण्याचा शिवसेना बाळासाहेबांची म्हणजेच शिंदे गटाचा प्रयत्न असल्याची माहिती समोर येत आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्ष आणि भाजप युतीची उमेदवारी त्यांना द्यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न करत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.