InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

…आणि उमेदवाराने ईव्हीएम मशीन जमिनीवर आदळून फोडलं

2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी देशभरातील 91 मतदारसंघात आज मतदान पार पडणार आहे. आज सकाळपासूनच सर्वत्र मतदानासाठी सुरूवात झाली आहे. मात्र आंध्रप्रदेशाती विधानसभा उमेदवाराने रागामध्ये ईव्हीएम मशीन जमीनीवर आदळून फोडल्याची घटना घडली आहे.

आंध्रप्रदेशातील अनंतरपूर जिल्ह्यातील जन सेना पक्षाचे उमेदवार मधुसुदन गुप्ता यांनी गुटी येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन जमीनीवर आदळलं. या घटनेनंतर मतदान केंद्रावर गोंधळ उडाला होता. या प्रकारानंतर पोलिसांनी मधुसुदन गुप्ता यांना अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.