InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

भाजप, वायएसआर करतंय सुडाचं राजकारण- टीडीपी

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते एन. चंद्राबाबू नायडू यांची शुक्रवारी मध्यरात्री गन्नवरम विमानतळावर तपासणी करण्यात आली. विमानापर्यंत जाण्यासाठी त्यांना व्हीआयपी सुविधा नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांना सर्वसामान्य प्रवाशांसारखे बसमधून प्रवास करावा लागला. या घटनेमुळे टीडीपीने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.

भाजप आणि वायएसआर काँग्रेस सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप टीडीपीने केला आहे.

तेलुगु देशम पार्टीचे प्रमुख असलेल्या चंद्राबाबू नायडू यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा असताना त्यांना ही वागणूक कशी काय दिली?, असा सवाल टीडीपी नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री चिन्ना राजप्पा यांनी केला आहे.

चंद्राबाबू नायडू हे माओवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. त्यामुळे त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आलेली आहे. नायडू यांच्या ताफ्यातील दोन गाड्या कमी करण्यात आल्याचा आरोपही टीडीपीने केला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या 

उदयनराजे भडकले, म्हणाले पिसाळलेल्या कुत्र्याला आधी आवरा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.