संकटाच्या काळात मयताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या काही औलादी आहेत : अजित पवार

सातारा : राज्यातील लॉकडाऊन अजून 15 दिवस वाढवण्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलीय. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे आणि सातारा जिल्ह्याचा दौरा केलाय. यावेळी नादुरुस्त व्हेंटिलेटरच्या मुद्द्यावरुन अजित पवार चांगलेच संतापले. पीएम केअरकडून आलेले अनेक व्हेंटिलेटर नादुरुस्त आहेत. आम्हाला यात राजकारण करायचं नाही. पण असे व्हेंटिलेटर दुरुस्त करुन घ्यावे लागत आहेत. अशा काळात मयताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या काही औलादी आहेत, अशा शब्दात अजित पवार यांनी संताप व्यक्त केलाय.

राज्यात आता रेमडेसिव्हीरचा तुटवडा राहिला नाही. पण म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शन कमी पडत आहे. तसंच रुग्णालयातील ऑक्सिजन, फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिटच्या सूचना दिल्याची माहितीही त्यांनी दिली. आपण फक्त परिस्थितीचा आढावा घेतला नाही तर मार्ग काढण्याचा प्रयत्न केलाय. जिथे कर्मचारी कमी आहेत, तिथे कर्मचारी दिले.

7 रुग्णवाहिका उद्या साताऱ्यासाठी येतील. लसीकरणासाठी दादागिरीच्या तक्रारी आल्या आहेत. त्याबाबत पोलिसांना कुणाचाही मुलाहिजा न ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशा शब्दात अजितदादांनी दादागिरी करणाऱ्यांना इशारा दिलाय. साताऱ्यातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्यासाठी प्रशासनाकडून काही कठोर पावलं उचलली जातील. त्यामुळे सातारकरांनी वाईट वाटून घेऊ नये. कारवाईची वेळ नागरिकांनी आणू नये, असं अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा